‘या’ अभिनेत्रीचा घाम विकत घेण्यासाठी चाहत्यांची उडते झुंबड; दिवसाची कमाई माहित आहे का?

0
WhatsApp Group

लोक कोणत्या कोणत्या गोष्टींचा बिझनेस करतील याचा नेम नाही. पैसे कमवण्यासाठी काहीजण काहीही करु शकतात. एका तरुण टीव्ही स्टारने एका अशा गोष्टीचा बिझनेस केला आहे ज्याबद्दल जाणून घेतल्यावर तुम्हाला किळस वाटेल. ही तरुणी तिचा घाम विकते. कोणाचा घाम कोणी कसा काय विकत घेऊ शकतो? पण तिचे चाहते हा घाम विकत घेतात. तोही 1 बॉटल 40 हजार रुपये या दराने. तिच्या घामाला इतकी मागणी आहे की दर दिवसाला ती 4 लाख रुपये कमवते.

स्टेफनी मॅटो (Stephanie Matto)असं या टीव्ही स्टारचं नाव आहे. तिच्या घामात एवढ काय आहे की तिचे चाहते त्यासाठी इतकी किंमत मोजतात? असा प्रश्न तुम्हाला पडला असणारच. त्याचे उत्तर तिने असं दिले आहे की, तिच्या चाहत्यांना तिच्या घामाचा वास घेतल्यावर ती त्यांच्या जवळच आहे असं वाटतं. तिच्या सोबत असण्याचा अनुभव घेता यावा म्हणून चक्क ते तिचा घाम विकत घेतात.

स्टेफनीसाठी घाम जमा करणं हे दिसतं तितकं सोप काम नाही. यासाठी तिला उन्हामध्ये स्विमींग पुलच्या जवळ कित्येक वेळ बसावे लागते. जास्तीत जास्त घाम यावा म्हणून ती भरपूर पाणी पिते. पण या प्रक्रियेत ती स्वत:ची काळजीही घेते. उन्हापासून स्वत:चे संरक्षण करते.