
TV Actress Vaishali Thakkar Suicide: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्कर हिने गळफास लावून आत्महत्या केली आहे. ती 1 वर्षापासून इंदूरमध्ये राहत होती. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी घटनास्थळावरून सुसाईड नोट जप्त केली आहे.
वैशाली ठक्कर गेल्या एक वर्षापासून इंदूरमध्ये राहत होती. येथे तिने गळफास लावून आत्महत्या केली. तेजाजी नगर पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून त्यांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही सापडली आहे. प्राथमिक तपासात हे प्रेमप्रकरण असल्याचे सांगण्यात येत आहे.
View this post on Instagram
आज सकाळी अभिनेत्री वैशाली ठक्कर तिच्या खोलीतून बाहेर न आल्याने वडिलांनी तिच्या खोलीत जाऊन पाहिले असता ती फासावर लटकत असल्याचे दिसले. यानंतर वडिलांनी संपूर्ण प्रकरण तेजाजी नगर पोलिसांना कळवले. तेजाजी नगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी इंदूरच्या एमवाय हॉस्पिटलमध्ये पाठवला.
त्याचबरोबर तिच्या खोलीमध्ये सुसाईड नोटही सापडली असून त्यात प्रेमप्रकरणासह विविध प्रकारच्या त्रासाचा उल्लेख आहे. सध्या पोलिसांनी सुसाईड नोट जप्त करून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सुसाईड नोट जप्त करण्यासोबतच वैशालीचा मोबाईलही जप्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर कुटुंबीयांचे जबाबही घेतले जात आहेत.