Aman Jaiswal Death: टीव्ही अभिनेता अमन जयस्वालचं रस्ते अपघातात निधन, वयाच्या 23 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Aman Jaiswal Death: ‘धरतीपुत्र नंदिनी’ या टीव्ही शोमध्ये मुख्य भूमिका साकारणारा टीव्ही अभिनेता अमन जयस्वालचे रस्ते अपघातात निधन झाले. तो 23 वर्षांचा ,होता. अभिनेत्याच्या एका मित्राने सांगितले की अमन शूटिंगवरून घरी परतत असताना मुंबईतील जोगेश्वरी महामार्गावर त्याच्या दुचाकीला एका ट्रकने धडक दिली. अपघाताच्या वेळी अभिनेता दुचाकीवर होता. त्याला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. अपघातानंतर अर्ध्या तासाने त्याचा मृत्यू झाला.