मुंबई इंडियन्सचा टायमल मिल्स आयपीएल 2022 मधून बाहेर, त्याच्या जागी ‘हा’ धाकड यष्टीरक्षक संघात सामील

WhatsApp Group

मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल 2022च्या चालू हंगामात चांगली कामगिरी करू शकला आहे. मुंबईने 9 सामने खेळले असून यात फक्त एकच सामन्यात विजय मिळवला आहे. त्यातच मुंबईचा डावखुरा वेगवान गोलंदाज टायमल मिल्स दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. त्याच्या जागी दक्षिण आफ्रिकेच्या ट्रिस्टन स्टब्सचा समावेश करण्यात आला आहे.

ट्रिस्टन स्टब्सने अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाहीय. मात्र तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालत आहे. त्याने आतापर्यंत १७ टी२० सामने खेळताना ५०६ धावा केल्या आहेत. १५७.१४च्या स्ट्राईक रेटने त्याने या धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३ अर्धशतकेही झळकावली आहेत. ट्रिस्टन स्टब्सला मुंबईने २० लाख रुपये खर्च करत संघात सहभागी केले आहे.

ट्रिस्टनहा धडाकेबाज फलंदाजीबरोबर अचूक गोलंदाजीही करू शकतो. त्यामुळे एका अष्टपैलू खेळाडूची भूमिका ट्रिस्टान हा निभावू शकतो. त्यामुळे आता उर्वरीत सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाला प्रयोग करायचा असेल तर त्यांच्यासाठी ट्रिस्टान हा सर्वात चांगला पर्याय ठरू शकतो.

त्यामुळे आता मुंबईचा संघ आता ट्रिस्टानला कधी संधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष राहीलेले आहे. मुंबईच्या संघाचे आययपीएलमधील आव्हान संपुष्टात आले असले तरी त्यांचे स्पर्धेतील वजन मात्र अजूनही कमी झालेले नाही. कारण मुंबईने आता पहिला विजय मिळवला आहे.

एकदा का मुंबईची गाडी विजयाच्या ट्रॅकवर आली तर ती वेगाने धावायला लागते, हे आजपर्यंत मुंबईने दाखवून दिले आहे. त्यामुळे आता मुंबईचा संघ हा जरी प्ले ऑफमध्ये पोहोचणार नसला तरी बाकीच्या संघांचे प्ले ऑफचे स्वप्न ते बेचिराख करू शकतात. त्यामुळे आता आयपीएलमध्ये मुंबईचा संघ हा सर्वात धोकादायक झालेला आहे.