पनवेलमध्ये रेल्वे रुळावरून घसरली, मोठा अपघात

हार्बर मार्गावर ३८ तासांचा रेल्वे मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. हा मेगा ब्लॉक बेलापूर ते पनवेल स्थानकादरम्यान आहे.

WhatsApp Group

पनवेल वसई रेल्वे मार्गावर एक मालगाडी रुळावरून घसरली आहे. मालगाडीचे चार डबे रुळावरून घसरले. ही मालगाडी वसईच्या दिशेने निघाली होती. मालगाडी रुळावरून घसरल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून डबे हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रुळावरून घसरलेले डबे हटवल्यानंतरच या मार्गावरील वाहतूक सुरळीत होईल. त्यामुळे या मार्गावरील सर्व गाड्या विस्कळीत झाल्या आहेत.

हार्बर मार्गावर ३८ तासांचा रेल्वे मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. हा मेगा ब्लॉक बेलापूर ते पनवेल स्थानकादरम्यान आहे. शनिवार 30 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजल्यापासून सोमवार 2 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत लोकल सेवा बंद राहतील.. पश्चिम मालवाहतूक कॉरिडॉर अंतर्गत दोन नवीन रेल्वे मार्गांच्या उभारणीसाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येत आहे.


गणेशोत्सवानंतर कोकणातून मुंबईत येणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेने मडगाव ते पनवेल आणि पनवेल ते खेड दरम्यान मेमू ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या अनारक्षित असतील. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.