‘पुण्य हूं या पाप हूं..’, शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

WhatsApp Group

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. प्रेक्षक या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत. अलीकडेच ‘मिशन इम्पॉसिबल 7’ सोबत ‘जवान’चा ट्रेलर लाँच होणार असल्याची बातमी आली होती. प्रेक्षकांच्या प्रतिक्षेला पूर्णविराम देत शाहरुख खानने अखेर बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या ट्रेलरच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

शाहरुख खानने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट ट्विटरवर टॅगलाइनसह ‘जवान’चा व्हिडिओ शेअर करून ट्रेलरच्या रिलीजची तारीख आणि वेळ उघड केली आहे. शाहरुखने लिहिले, ‘जवान’चे प्रिव्ह्यू 10 जुलैला येत आहे. 10 सप्टेंबर 2023 रोजी हिंदी, तमिळ आणि तेलुगुमध्ये जगभरात रिलीज होईल. 10 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता ट्रेलर रिलीज होणार असल्याचे व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे.