ट्रॅफिक कॉन्स्टेबल तुमच्या गाडीची चावी काढू शकतात का?, वाचा काय म्हणतो नियम

WhatsApp Group

आपल्या धावपळीच्या जीवनात आपण गाडी चालवताना अनेक वेळा चुका करत असतो. जसे, कार चालवताना सीट बेल्ट लावायला विसरलो दुचाकी चालवताना हेल्मेट नसेल किंवा वाहनाचा लाईट किंवा हॉर्न नीट वाजत नसेल तर तोही ड्रायव्हिंगचा दोष मानला जातो. असे असले तरी याचा अर्थ असा नाही की ट्रॅफिक हवालदार तुमचे चालान फाडू शकतात. जर हवालदार तुमच्या गाडीची चावी काढत असतील तर तेही नियमांच्या विरोधात आहे. तुम्हाला अटक करण्याचा/वाहन सिझ करण्याचा अधिकारही त्यांना नसतो. अनेकदा आपली झालेली चूक होते आणि अश्यावेळी आपण घाबरून जातो. परंतु अशा वेळी आपल्याही अधिकारांची आपण माहिती ठेवली पाहिजे.

भारतीय मोटार वाहन कायदा 1932 अंतर्गत, केवळ एएसआय स्तरावरील अधिकारीच वाहतुकीच्या नियमांच्या उल्लंघनासाठी तुमचे चालान कापू शकतात. एएसआय, एसआय, इन्स्पेक्टर यांना जागी दंड आकारण्याचे अधिकार आहेत. यांना मदत करण्यासाठी वाहतूक हवालदारच असतात. कोणाच्याही गाडीच्या चाव्या काढण्याचा अधिकार त्यांना नसतो. एवढेच नव्हे तर ते तुमच्या गाडीच्या टायरची हवाही काढू शकत नाहीत. ते तुमच्याशी चुकीच्या पद्धतीने बोलू शकत नाहीत. वाहतूक पोलीस तुम्हाला विनाकारण त्रास देत असतील, तर तुम्ही त्याच्यावरही कायद्याने कारवाई करू शकता.

या गोष्टी लक्षात ठेवा 

  • तुमचे चालान कापण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे चालान बुक किंवा ई-चलान मशीन असणे आवश्यक आहे. जर या दोघांपैकी काहीही त्यांच्यासोबत नसेल तर तुमचे चालान कापले जाऊ शकत नाही.
  • वाहतूक पोलिसांनीही गणवेशात असणे गरजेचे आहे. युनिफॉर्मवर बकल नंबर आणि त्यांचे नाव असावे.
  • ते गणवेशात नसतील तुम्ही पोलीस कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र विचारू शकता.
  • वाहतूक पोलिसांचे हेड कॉन्स्टेबल तुम्हाला फक्त १०० रुपयांचा दंड करू शकतो. यापेक्षा जास्त दंड, फक्त वाहतूक अधिकारी म्हणजेच एएसआय किंवा एसआय करू शकतात. म्हणजेच ते १०० रुपयांपेक्षा जास्त चालान करू शकतात.
  • जर ट्रॅफिक हवालदार तुमच्या गाडीची चावी काढून घेत असतील तर तुम्ही त्या घटनेचा व्हिडीओ बनवा. हा व्हिडीओ तुम्ही त्या भागातील पोलीस ठाण्यामध्ये जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्याला दाखवून तक्रार करू शकता.

वाहन चालवताना तुमच्याकडे तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सची मूळ प्रत, पीयुसी असणे गरजेचे आहे. त्याच वेळी, वाहन नोंदणी आणि विम्याची झेरॉक्स देखील असली तर चालू शकते.जर तुमच्याकडे त्या क्षणी दंडाचे पैसे भरण्यासाठी रक्कम नसेल तर तुम्ही नंतरही दंड भरू शकता. अशा परिस्थितीत न्यायालय चालान जारी करते, तेही न्यायालयामध्ये जाऊन भरावे लागेल. या काळात वाहतूक अधिकारी तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स त्यांच्याकडे ठेवू शकतात.