
मुंबई – माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित मुंबईच्या समुद्रकिनारी जुहू बीच येथे आयोजित केलेल्या सचित्र प्रदर्शनास आज समुद्र किनारा पाहावयास आलेल्या अनेक पर्यटकांनी आवर्जून भेट दिली. यावेळी कोविड काळात महाराष्ट्र शासनाने केलेल्या उत्तम कामगिरीची नोंद सामान्य माणसाने घेतली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत शासनाच्या विविध योजना व विकासाकामांवर आधारित चित्रमय प्रदर्शन १ मे २०२२ पासून भरविण्यात आले असून हे प्रदर्शन ५ मे २०२२ पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.
‘दोन वर्षे जनसेवेची,महाविकास आघाडीची’ छायाचित्र प्रदर्शनाला विद्यार्थी,युवक तसेच नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहातील आर्ट गॅलरीत हे प्रदर्शन सुरु असून,ते दि.5 मेपर्यंत सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. pic.twitter.com/XaGDLNXnwS
— DISTRICT INFORMATION OFFICE, AMRAVATI (@InfoAmravati) May 2, 2022
या प्रदर्शनास विशेषत: जुहू चौपाटी येथे कार्यरत कर्मचाऱ्यांबरोबरच महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी, सामान्यजन तसेच समुद्र किनारी फिरावयास आलेल्या पर्यटकांनी भेट दिली.