मोहम्मद रिझवान बनला Asia Cup 2022 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज, कोहली कितव्या क्रमांकावर?

WhatsApp Group

Asia Cup 2022 Most Runs : आशिया कप 2022 च्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा 23 धावांनी पराभव केला. या सामन्यासाठी भानुका राजपक्षेला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून गौरविण्यात आले. तर वानिंदू हसरंगाला ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ म्हणून गौरविण्यात आले. पण या स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानच्या नावावर आहे. या यादीत भारताचा माजी कर्णधार विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या पाच खेळाडूंच्या यादीत कोहली हा एकमेव भारतीय आहे.

आशिया चषक 2022 मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत रिझवान अव्वल आहे. त्याने 6 सामन्यात 281 धावा केल्या. यादरम्यान रिझवानने तीन अर्धशतके झळकावली. या यादीत कोहली दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याने 5 सामन्यात 276 धावा केल्या. कोहलीने एक शतक आणि दोन अर्धशतके झळकावली. इब्राहिम झद्रानने तिसरे स्थान पटकावले. त्याने 5 सामन्यात 196 धावा केल्या. तर भानुका राजपक्षे 191 धावांसह चौथ्या स्थानावर आहे. श्रीलंकेसाठी भानुकाने सर्वाधिक धावा केल्या.

यावेळी आशिया चषकात सर्वाधिक अर्धशतके झळकावण्याच्या बाबतीतही रिझवान पहिल्या स्थानावर आहे. त्याने तीन अर्धशतके झळकावली आहेत. कोहली, निसांका आणि कुसल मेंडिस यांनी प्रत्येकी दोन अर्धशतके झळकावली. या स्पर्धेत शतक झळकावणारा कोहली एकमेव खेळाडू होता. त्याने अफगाणिस्तानविरुद्ध 61 चेंडूत नाबाद 122 धावांची खेळी केली. कोहलीने या सामन्यात 12 चौकार आणि 6 षटकार मारले होते.

आशिया कप 2022 मध्ये सर्वाधिक धावा

  • मोहम्मद रिझवान – 281 धावा
  • विराट कोहली – 276 धावा
  • इब्राहिम झद्रान – 196 धावा
  • भानुका राजपक्षे – 191 धावा
  • पथुम निसांका – 173 धावा