
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना दरवर्षी प्रमाणे यंदाही टोल माफ करण्यात आला आहे. यंदा शनिवार २७ ऑगस्ट पासून ११ सप्टेंबर दरम्यान प्रवास करणार्यांना टोल नाक्या वर ही सवलत असणार आहे.
गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफीसह अन्य सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते, त्यानुसार आज सार्वजनिक बांधकाम विभागाने पथकर सवलतीचा शासन निर्णय जारी केला आहे.
– गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना पथकर माफ करण्याचा मुख्यमंत्री @mieknathshinde यांचा निर्णय.
– त्याची अंमलबजावणी उद्यापासून करण्यात येणार असून पथकर नाक्यांवर ही सवलत ११ सप्टेंबरपर्यंत असणार. @CMOMaharashtra @DDNewslive @DDNewsHindi pic.twitter.com/fDVfByI670— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) August 26, 2022
दिनांक २७ ऑगस्ट ते दिनांक ११ सप्टेंबर या कालावधीत मुंबई – बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग (राम-४८), मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (रा. म. ६६) यावरील व इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यावर कोकणात जाणाऱ्या गणेशोत्सव भाविकांच्या वाहनांना पथकरातून सवलत देण्यात येत असल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे.
या टोलमाफी सवलतीसाठी ‘गणेशोत्सव २०२२, कोकण दर्शन’ अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पास, त्यावर वाहन क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर लिहून ते स्टीकर्स आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस/पोलीस, संबंधित प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ.) यांनी समन्वय साधून पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. कार्यालयांमध्ये उपलब्ध करुन द्यावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. हाच पास परतीच्या प्रवासाकरीता देखील ग्राह्य धरण्यात येईल.
पोलीस व परिवहन विभागाने गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती नागरिकांना देण्याच्या देखील सूचना आहेत.
ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजन! या बातम्यांसाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये नक्की Add व्हा https://chat.whatsapp.com/FT9G2GTaGLm4DsImkvflms
For more updates, be socially connected with us on – Instagram, Twitter, Facebook