कोकणातील मुंबई-गोवा महामार्गावरील दोन टोलनाक्यावर उद्यापासून टोलवसुली

WhatsApp Group

सिंधुदुर्ग – मुंबई-गोवा महामार्गावर राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने कोकणातील दोन टोल नाक्यावर टोल वसुलीला सुरुवात करण्याची अधिकृत तारीख निश्चित केली आहे. कणकवलीमधील ओसरगाव टोल नाक्यासोबत रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमधल्या हातीवलेमध्येही उद्यापासून (१जून) टोल वसुली सुरु होणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गाने ये जा करणाऱ्या प्रवाशांना तसेच पर्यटकांना टोलवसुलीचा आता फटका बसणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या भूमिकेकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जानवली ते पत्रादेवी या ६० किमी लांबी करता एम डी करीमुन्नीसा या टोल ठेकेदार कंपनीमार्फत उद्यापासून टोलवसुली सुरु करण्यात येणार आहे.

असा असेल टोलचा दर

  • जीप, व्हॅन, कार – सिंगल जर्नी ९० रुपये
  • रिर्टन जर्नी टोल घेतल्यास १३५ रुपये दर
  • हलकी व्यावसायिक वाहनं, मोठी मालवाहू वाहनं आणि मिनीबससाठी १३५ रुपये
  • रिटर्न जर्नीसाठी २२० रुपये
  • ट्रक आणि बससाठी (डबल अँक्सल) – ३०५ रुपये
  • रिटर्न जर्नीसाठी ४६० रुपये
  • ट्रक आणि बस (ट्रिपल अँक्सल) – ३३५ रुपये
  • रिटर्न जर्नीसाठी – ५०० रुपये
  • MH ०७ पासिंग वाहनांसाठी ४५ रुपये टोल
  • MH ०७ पासिंग मिनीबससाठी ७५ रुपये
  • MH ०७ पासिंग ट्रक-बससाठी ११५ रुपये