आज राजस्थानसमोर असेल हैदराबादचे आव्हान, कोणता संघ करणार विजयाने सुरुवात?

WhatsApp Group

एमसीए स्टेडियमवर आज दोन IPL चॅम्पियन राहिलेल्या संघांमध्ये सामना होणार आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स Hyderabad vs Rajasthan यांच्यात आजचा सामना होत आहे. या सीझनच्या मेगा लिलावात राजस्थान रॉयल्सने आपल्या संघात मॅच विनर खेळाडूंचा समावेश केला आहे. तसेच नेहमीप्रमाणे सनरायझर्स हैदराबादचा संघ जबरदस्त गोलंदाजी करत मैदानात उतरेल.

गेल्या काही वर्षांपासून संघासोबत असलेला कर्णधार संजू सॅमसनच्या कामगिरीवर रॉयल्सची फलंदाजी मोठ्या प्रमाणावर अवलंबून असेल, परंतु त्याला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. रॉयल्सने 2008 मध्ये दिवंगत शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली पहिले आयपीएल विजेतेपद जिंकले, परंतु त्यानंतर संघाला कधीही चांगली कामगिरी करता आली नाही. सॅमसनने दरवर्षी एक-दोन सामन्यांत चांगला खेळ केला आहे, पण रॉयल्सला दुसरे विजेतेपद मिळवायचे असेल, तर त्याला त्याच्या कामगिरीत सातत्य ठेवावे लागेल.

पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सायंकाळी साडेसात वाजल्यापासून दोन्ही संघांमधील सामना रंगणार आहे. या सामन्यात दोन्ही संघांना विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात करायची आहे.

राजस्थान रॉयल्सचा संभाव्य संघ देवदत्त पडिक्कल, यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, जिमी नीशम, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, प्रशांत कृष्णा

सनरायझर्स हैदराबादचा संभाव्य संघ  – राहुल त्रिपाठी, अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), निकोलस पूरन, एडन मार्कराम, अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर, रोमॅरियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक