PM Modi : पंतप्रधानांचा आज महाराष्ट्र दौरा, मुंबईत मोदी-ठाकरे येणार एकाच मंचावर!

WhatsApp Group

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. देहूतील कार्यक्रम झाल्यानंतर मुंबईमध्ये येणार आहेत. यावेळी राजभवनातील क्रांतीकारी गॅलरीचे उद्धाटन मोदींच्या हस्ते होणार आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार असल्यामुळे मोदी आणि ठाकरे एकत्र येणार आहेत.

नरेंद्र मोदींचा पहिला कार्यक्रम पुण्यातील देहूमध्ये आहे. संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तीचे अन् शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे बऱ्याच दिवसांनंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान एकत्र एका कार्यक्रमात दिसतील.