कोरोना वाढवतोय टेन्शन! आज पुन्हा अडीच हजाराहून अधिक नवे रुग्ण तर ३० जणांचा मृत्यू

WhatsApp Group

Corona Cases in India देशात सध्या कोरोना रुग्णांचा आकडा आता दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत देशामध्ये २,५४१ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर ३० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

सध्या भारतातील कोरोना संक्रमणाचा दर ०.८४ टक्के एवढा आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या १६ हजार ५२२ इतकी झाली आहे. तर गेल्या २४ तासांमध्ये १,८६२ जणांनी कोरोनावर मात केली आहे.


देशातील कोरोना आकडेवारी
एकूण प्रकरणं- ४,३०,६०,०८६
सक्रिय रुग्ण- १६,५२२
एकूण बरे झालेले रुग्ण- ४,२५,२१,३४१
एकूण मृत्यू- ५,२२,२२३
एकूण लसीकरण- १,८७,७१,९५,७८१मात केली आहे.