आज पोलिओ रविवार; पाच वर्षापेक्षा लहान बालकांसाठी ‘दो बूंद जिंदगी के’ आवश्यक

WhatsApp Group

मुंबई – आज संपूर्ण देशात आणि राज्याभरात पल्स पोलिओ लसीकरण दिवस pulse polio Day साजरा करण्यात येतं आहे. राज्यात ठिकठिकाणी पोलिओ लसीकरणाचे कार्यक्रम होणार आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये या लसीकरण अभियानाची सुरुवात आज होईल. त्यामुळे आपल्या बालकांना आज पोलिओचा डोस द्यायला विसरु नका. कोरोनामुळे पोलिओ लसीकरणामध्ये घट झाल्याचे पाहायला मिळाले होते.

मात्र सध्या कोरोना लसीमुळे वॅक्सिनचे महत्व वाढले आणि सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव देखील कमी झाला असल्याने आज पोलिओचे ‘दो बूंद’ आपल्या बालकांना द्यावेत असे आवाहन केले जात आहे. पोलिओ लसीकरणाच्या अभियान कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतात ५ वर्षाखालील कमी वयाच्या मुलांना हे लसीकरण करण्यात  येतं.

पल्स पोलिओ लसीकरण दिवसाच्या निमित्ताने राज्यातील पाच वर्षाच्या आतील कोणतेही बालक या लसीकरणाच्या अभियानापासून वंचित राहू नये यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. आजचा दिवस हा ‘पोलिओ रविवार’ किंवा ‘पल्स पोलिओ दिवस’ म्हणूनही ओळखला जातो.  पोलिओ अद्याप नष्ट झालेला नसल्याने ५ वर्षाखालील कमी वयाच्या मुलांना पोलिओची लस आवश्यक आहे.