धोनी आयपीएलला अलविदा करणार?, आज फेसबुक लाईव्हमध्ये चाहत्यांसमोर करणार मोठी घोषणा

WhatsApp Group

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी काय निर्णय घेईल याची कल्पना करणे खूप कठीण आहे. धोनी नेहमीच चाहत्यांना आश्चर्यचकित करत आला आहे. क्रिकेटच्या मैदानावर डीआरएस घेणे असो किंवा अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणे असो. धोनीच्या मनात काय चालले आहे हे फक्त आणि फक्त धोनीलाच माहीत आहे. धोनी सोशल मीडियावर तितका सक्रिय नसला तरी तो वेळोवेळी सर्वांना आश्चर्यचकित करतो.

धोनी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे आणि यामागचे कारण म्हणजे त्याची सोशल मीडियावरील एक पोस्ट आहे ज्यामध्ये त्याने आज 25 सप्टेंबर रोजी एक मोठी घोषणा करणार असल्याचे म्हटले आहे. धोनीने त्याच्या फेसबुकवर लिहिले की, “मी 25 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता तुम्हा सर्वांसोबत काही रोमांचक बातम्या शेअर करणार आहे. तिथे तुम्हा सर्वांना भेटायला उत्सुक आहे!” या पोस्टसोबत एक फोटोही शेअर करण्यात आला आहे, ज्यावर लिहिले आहे- Exclusive MS Dhoni Goes Live.

ही पोस्ट समोर आल्यानंतर धोनीच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली असून धोनी आयपीएलमधून निवृत्त होणार असल्याचे मानले जात आहे. आता धोनी आज कोणती मोठी घोषणा करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा