तिरुमला तिरुपती देवस्थानमचे कार्यकारी अधिकारी धर्मा रेड्डी यांच्या मुलाचे निधन

WhatsApp Group

तिरुमला तिरुपती देवस्थानम म्हणजेच टीटीडीचे कार्यकारी अधिकारी धर्मा रेड्डी यांचा 28 वर्षीय मुलगा चंद्रमौली रेड्डी यांचे निधन झाले आहे. असे सांगितले जात आहे की धर्मा रेड्डी यांच्या मुलाला तीन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चेन्नईतील कावेरी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते, तिथे हृदयविकाराच्या झटक्याने तीन दिवसांनी त्यांचे निधन झाले. रिपोर्ट्सनुसार, त्यांची एंगेजमेंट झाली होती आणि जानेवारीत लग्न होणार होते.

Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा