मुंबईच्या खेळाडूचा पाकिस्तान सुपर लीगमध्ये धमाका, 20 चेंडूत केलं झंझावाती अर्धशतक

WhatsApp Group

पाकिस्तान सुपर लीगमध्ये इस्लामाबाद युनायटेड आणि मुलतान सुलतान यांच्यात 24 वा सामना खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुलतान सुल्तान्सचा फलंदाज टिम डेव्हिडचं आक्रमक रूप पाहायला मिळालं. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या टीम डेव्हिडने Tim David 27 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 60 धावांची तुफानी खेळी केली. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 222.22 होता. डेव्हिड आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्सचा Mumbai Indians भाग आहे.

या खेळीच्या जोरावर टीम डेव्हिडने संघाला मोठी धावसंख्या गाठण्यास मदत केली. मुलतान सुलतान्सने 20 षटकात 5 विकेट गमावून 205 धावा केल्या. टीम डेव्हिडशिवाय संघाचा सलामीवीर शान मसूदने 50 चेंडूंत 12 चौकारांच्या मदतीने 75 धावा केल्या. त्याचवेळी कर्णधार मोहम्मद रिझवानने 18 चेंडूत 33 धावांची खेळी केली. याशिवाय रिले रोसोने 15 चेंडूत 15 आणि डेव्हिड मिलरने 9 चेंडूत 11 धावा केल्या. किरॉन पोलार्ड 1 धावेवर नाबाद परतला.

टीम डेव्हिडची ही कामगिरी मुंबईसाठी आनंदाची बातमी आहे. आयपीएल 2023 31 मार्चपासून सुरू होणार आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच संघाचे फलंदाज फॉर्ममध्ये दिसत आहेत. आयपीएल 2022 मध्ये, टीम डेव्हिडने मुंबई इंडियन्ससाठी एकूण 8 सामने खेळले, ज्यामध्ये त्याने फलंदाजी करताना 37.20 च्या सरासरीने आणि 216.28 च्या स्ट्राइक रेटने 186 धावा केल्या.

टीम डेव्हिडची आयपीएल कारकीर्द फार मोठी नाही. त्याने 2021 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि त्या वर्षी फक्त एकच सामना खेळला. डेव्हिडने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 9 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 187 धावा केल्या आहेत.