इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामासाठी मुंबई इंडियन्सचा Mumbai Indians नवा स्टार टीम डेव्हिड Tim David मुंबईत पोहोचला आहे. पाच वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबईने आयपीएल 2022 च्या लिलावात डेव्हिडला 8.25 कोटी रुपयांना विकत घेतले. गेल्या मोसमात तो रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसाठी खेळला होता.
सिंगापूरमध्ये जन्मलेला फलंदाज टीम डेव्हिडला इंडियन प्रीमियर लीग 2022 च्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने 8.25 कोटी रुपयांना विकत घेतले. टीम डेव्हिडची मूळ किंमत 40 लाख रुपये होती.
मुंबई इंडियन्सने आपल्या सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये पुष्टी केली की त्यांचा हा नवीन स्टार खेळाडू गुरुवारी दुपारी मुंबईत दाखल झाला आहे. टीम डेव्हिड म्हणाला, “येथे आल्याने खूप आनंद झाला आहे, भारतात पहिल्यांदा आणि मोठ्या फ्रँचायझीमध्ये आल्याबद्दल आनंदी आहे. आशा आहे की, आम्ही या मोसमात चांगले क्रिकेट खेळू आणि चाहत्यांचे मनोरंजन करू.
आयपीएल लिलावात, दिल्ली कॅपिटल्सने सिंगापूरमध्ये जन्मलेल्या फलंदाजासाठी सुरुवातीची बोली लावली आणि लवकरच कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स या दोन नवीन संघांनी हा खेळाडू आपल्या ताफ्यात घेण्यासाठी मैदानात उतरले. मात्र, अखेर 8.25 कोटी खर्च करून मुंबईने त्याचा संघात समावेश झाला.
टीम डेव्हिड हा एक यशस्वी T20 फलंदाज आहे आणि तो BBL, PSL आणि CPL सारख्या T20 लीगमध्ये चांगला खेळत आहे. त्याने 14 टी-20 खेळले आहेत आणि 46.5 च्या सरासरीने आणि 158.5 च्या स्ट्राइक रेटने 558 धावा केल्या आहेत. 5 वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स 27 मार्च रोजी त्यांचा पहिला सामना खेळेल