Santosh Munde Death : टिकटॉक स्टार संतोष मुंडेचा शॉक लागून मृत्यू…..!

WhatsApp Group

टिक टॉक स्टार म्हणून अत्यंत कमी कालावधीत स्वत: ची एक वेगळीच ओळख निर्माण करणारा बीडमधील संतोष मुंडे याचा आज दुर्देवी मृत्यू झाला आहे. संतोषच्या निधनाची बातमी कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. संतोषसोबतच बाबुराव मुंडे याचाही मृत्यू झाला आहे. आज संध्याकाळी (13 डिसेंबर 2022) रोजी संतोष आणि बाबुराव हे दोघे डीपीचा फ्यूज बदलण्यासाठी गेले असता अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्यामुळे यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

संतोष मुंडे हा प्रसिद्ध टिक टॉक स्टार असून त्यांच्या निधनाची बातमी कळताच अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. बीडमधील धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथे ही घटना घडली. यात संतोष व बाबुराव यांचा जागीच मृत्यू झाला.