
Megha Thakur passes away: कॅनेडियन टिकटॉक स्टार मेघा ठाकूर हिचे आकस्मिक निधन झाले. मेघा ठाकूर ही बॉडी पॉझिटिव्हीटीवर बोलण्यास अधिक ओळखली जायची. तिच्या निधनाची बातमी आल्यापासून सोशल मीडियावर यूजर्स तिला श्रद्धांजली अर्पण करत आहेत. मात्र, तिच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. तिच्या चाहत्यांमध्ये दुःखाचे वातावरण आहे. मेघा ठाकूरच्या मृत्यूची बातमी तिच्या पालकांनी दिली आहे.
वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
मेघा ठाकूर फक्त 21 वर्षांची होती, तिचे टिक टॉकवर 93,000 फॉलोअर्स आहेत. ती ब्रॅम्प्टनमध्ये राहायची. ती मूळची इंदूरची रहिवासी होती. मेघा ठाकूर इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय असयाची. इंस्टाग्रामवर तिचे 101,000 फॉलोअर्स आहेत. तिने 18 नोव्हेंबर रोजी शेवटचा व्हिडिओ पोस्ट केला होता.
View this post on Instagram
मेघा ठाकूरच्या पालकांनी ही दुःखद बातमी इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. त्यांनी लिहिले की, ‘आम्हाला कळवायला अत्यंत दु:ख होत आहे की, आमच्या आयुष्यातील प्रकाश, आमची दयाळू आणि काळजी घेणारी लाडकी मुलगी मेघा ठाकूर हिचे 24 नोव्हेंबर रोजी अचानक निधन झाले. आम्ही मेघासाठी तुमच्या आशीर्वादाची विनंती करतो. तुमचे विचार आणि प्रार्थना तिच्या पुढच्या प्रवासात तिच्या पाठीशी नक्की असतील.