World Cup 2023 साठी BookMyShow वर बुक करता येणार तिकिटे, बीसीसीआयने दिली माहिती

0
WhatsApp Group

क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. BCCI ने ICC वर्ल्ड कप तिकिटांसाठी BookMyShow ला अधिकृत केले आहे. अशा प्रकारे क्रिकेट चाहत्यांना BookMyShow वर ऑनलाइन तिकीट बुक करता येणार आहे. 24 ऑगस्टपासून चाहत्यांना आगामी विश्वचषकाची तिकिटे खरेदी करता येणार आहेत. 24 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजल्यापासून ऑनलाइन तिकिटे उपलब्ध होतील. विश्वचषक सामन्यांव्यतिरिक्त, चाहत्यांना त्यापूर्वी सराव सामन्यांची ऑनलाइन तिकिटे देखील बुक करता येतील.

मात्र, विश्वचषक स्पर्धेतील भारतीय सामन्यांची तिकिटे 29 ऑगस्टपासून उपलब्ध होणार आहेत. 29 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजल्यापासून क्रिकेट चाहत्यांना ऑनलाईन तिकीट बुक करता येणार आहे. तर उपांत्य आणि अंतिम सामन्यांची तिकिटे 14 सप्टेंबरला संध्याकाळी 6 वाजल्यापासून उपलब्ध होणार आहेत. अशा प्रकारे क्रिकेट चाहत्यांना जागतिक सामन्यांची तिकिटे ऑनलाइन बुक करता येतील. या स्पर्धेतील पहिला सामना 5 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

वर्ल्ड कप 2023 मध्ये एकूण 58 सामने खेळवले जाणार आहेत. याआधी 10 सराव सामने होणार आहेत. 2023 चा विश्वचषक भारतातील 12 वेगवेगळ्या मैदानांवर खेळवला जाणार आहे. भारतीय संघ आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्ध करणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना 8 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे होणार आहे. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 14 ऑक्टोबरला होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने असतील.

India World Cup Schedule

Match No. Date Team 1 Team 2 Venue Time
5 Oct 8 India Australia MA Chidambaram Stadium 2:00 PM
8 Oct 11 India Afghanistan Arun Jaitley Stadium 2:00 PM
13 Oct 14 India Pakistan Narendra Modi Stadium 2:00 PM
17 Oct 19 India Bangladesh MCA Stadium 2:00 PM
21 Oct 22 India New Zealand HPCA Stadium 2:00 PM
29 Oct 29 India England Ekana Stadium 2:00 PM
33 Nov 2 India Sri Lanka Wankhede Stadium 2:00 PM
37 Nov 5 India South Africa Eden Gardens 2:00 PM
43 Nov 12 India Qualifier 1 M Chinnaswamy Stadium 2:00 PM

How To Book World Cup Online Ticket