भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांची विक्री लवकरच होणार सुरू, ‘या’ लिंकवर बुक करता येणार टिकिट

WhatsApp Group

Asia Cup 2022 IND vs PAK: आशिया कप 2022 27 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. पहिला सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे. तर दुसरा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. हा सामना 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. या सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. याबाबत आशियाई क्रिकेट परिषदेने नुकतीच चाहत्यांना मोठी बातमी दिली आहे. आशिया चषकाच्या तिकिटांचे बुकिंग 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

आशियाई क्रिकेट परिषदेने ट्विटरच्या माध्यमातून तिकीट बुकिंगची तारीख जाहीर केली. परिषदेने ट्विटमध्ये वेबसाइटची लिंकही दिली आहे, ज्याद्वारे तिकीट बुक करता येईल. 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. बुकिंग सुरू झाल्यानंतर लवकरच भारत-पाकिस्तान सामन्याची सर्व तिकिटे विकली जातील अशी अपेक्षा आहे. http://platinumlist.net या लिंकवर बुक करू शकता टिकिट.

27 ऑगस्टपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर अंतिम सामना 11 सप्टेंबर रोजी दुबईत होणार आहे. याआधी सुपर फोरचे 6 सामने खेळवले जाणार आहेत. सुपर फोरचा पहिला सामना 3 सप्टेंबरला शारजहानमध्ये होणार आहे. तर त्याचा शेवटचा सामना 9 सप्टेंबरला म्हणजे फायनलच्या दोन दिवस आधी होणार आहे. हा सामना दुबईत होणार आहे. सुपर फोरमधील पहिला सामना वगळता बाकीचे सर्व सामने दुबईत होणार आहेत.