वैभव नाईक यांच्या माध्यमातून मालवण आरसेमहाल नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात

WhatsApp Group

मालवणच्या सौदर्यात भर पाडणाऱ्या प्रसिद्ध आरसेमहाल , शासकीय विश्रामगृहाची इमारत मोडकळीस आल्याने त्या इमारतीचे नुतनीकरण करणे गरजेचे होते.कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी हि बाब विचारात घेऊन महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे ,सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्याकडे निधी मंजुरी साठी पाठपुरावा केला होता.

आमदार वैभव नाईक यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे आरसेमहाल, शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी बजेट मधून २ कोटी ९७ लाख रु.निधी मंजूर करण्यात आला होता. या कामाची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून आजपासून कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. आमदार वैभव नाईक यांनी याठिकाणी भेट देत कामाची पाहणी केली.कामाच्या दर्जाबाबत ठेकेदाराला आवश्यक सूचना यावेळी त्यांनी केल्या.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी, शहरप्रमुख बाबी जोगी, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर,सन्मेष परब, दीपक देसाई, महेश जावकर,किरण वाळके व ठेकेदार प्रतिनिधी उपस्थित होते.

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा