Mumbai: जुहू बीचवर पोहायला गेलेल्या तीन जणांचा बुडून मृत्यू

WhatsApp Group

मुंबई – मुंबईतील जुहू चौपाटीवरुन (Juhu Chowpatty Mumbai) धक्कादायक घटना समोर आली आहे. जुहू चौपाटीवर फिरण्यासाठी आलेलेल्या 3 मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. माहितीनुसार जुहू चौपाटीवर काल संध्याकाळी ही घटना घडली. चेंबूर येथील राहणारे चार मुलं जुहू चौपाटीवर फिरण्यासाठी आली होती. त्यातील तिघ जण पाण्यात बुडले. पाण्यात बुडालेल्या मुलांचे वय हे 16 ते 21 वर्ष दरम्यान असल्याचे सांगितले जात आहे.