आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाकडून ‘नारीशक्ती पुरस्कारा’ची घोषणा
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाकडून ‘नारीशक्ती पुरस्कारा’ची घोषणा करण्यात आली आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 28 महिलांना सोमवारी ‘नारीशक्ती पुरस्कार’ जाहीर झाला आहे. यात महाराष्ट्रातील तीन महिलांचा समावेश आहे. 2020 आणि 2021 या वर्षासाठीच्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.
On the eve of Women’s Day, interacted with recipients of the Nari Shakti Puraskar. We are very proud of their accomplishments and their efforts to serve society. https://t.co/lfJIr6A1nn pic.twitter.com/wOlLHDeAW4
— Narendra Modi (@narendramodi) March 7, 2022
महाराष्ट्रामधील तीन महिलांमध्ये कथक नृत्यांगना डाऊन सिंड्रोमप्रभावित सायली आगवणे, वनिता बोराडे या पहिल्या महिला सर्पमित्र यांना वर्ष 2020 साठी तर वर्ष 2021 साठी सामाजिक उद्योजिका कमल कुंभार यांना नारी शक्ती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मंगळवारी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्यादिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथे आयोजित कार्यक्रमामध्ये पुरस्काचे वितरण करण्यात येणार आहे.