पालघरमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची भिंत कोसळून तीन महिलांचा मृत्यू

0
WhatsApp Group

पालघर : पालघर जिल्ह्यातील विरार भागात मंगळवारी दुपारी बांधकाम सुरू असलेली भिंत कोसळून तीन महिला मजुरांचा मृत्यू झाला. विरार परिसरातील मनवेलपाडा येथील एका बांधकाम साईटवर दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत आणखी एक महिला जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

विरार परिसरातील मनवेलपाडा येथे एका बांधकामाच्या ठिकाणी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यांनी सांगितले की, महिलांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले, मात्र दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

विरार पोलिसांनी दिलेल्या माहितीत सांगितले की, पालघर जिल्ह्यातील विरार परिसरात पुनर्विकास करण्यात येत असलेल्या इमारतीचा ढिगारा पडल्याने ३ मजुरांचा मृत्यू झाला असून २ मजूर जखमी झाले आहेत. या मजुरांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शौबाई सुळे (४५), लक्ष्मी घावणे (४५) आणि राधा नवघरे (४०) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेत आणखी एक महिला जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी विरार पोलीस तपास करत आहेत.