जम्मू कश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत तीन जवान शहीद, दोन दहशतवादी ठार

WhatsApp Group

स्वातंत्र्य दिनापूर्वी जम्मू-काश्मीरमधील राजौरीपासून 25 मी अंतरावर दोन दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला केला. यात दोन्ही दहशतवादी ठार झाले तर 3 जवान शहीद झाले. दहशतवाद्यांनी लष्कराच्या छावणीत घुसण्याचा प्रयत्न केला. यानंतर सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले. यामध्ये दोन दहशतवादी मारले गेले.

मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी आर्मी कॅम्पमध्ये आत्मघाती हल्ला केला होता. यामध्ये दोन्ही दहशतवादी मारले गेले. मात्र, या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले. दहशतवाद्यांनी उरीसारखा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे समजते.

2016 मध्ये पाकिस्तानातून आलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या चार दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील उरी येथील लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला केला होता. यामध्ये 19जवान शहीद झाले. त्याचवेळी अनेक जवान जखमी झाले. सुरक्षा दलांनी चारही दहशतवाद्यांचा खात्मा केला. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पीओकेमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केले आणि अनेक दहशतवादी लॉन्च पॅड नष्ट केले.

याआधी बुधवारी बडगाममध्ये सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. मारले गेलेले दहशतवादी लष्करचे होते. त्यात लतीफ रादर होता. त्याला जम्मू-काश्मीरमधील टार्गेट किलिंगचा मास्टरमाईंड म्हटले जात होते. त्याच्या नुसत्या नावाने लोक थरथर कापायचे. सुरक्षा दल बरेच दिवस त्याचा शोध घेत होते. 2012 मध्ये श्रीनगर हायवे हल्ल्यातही त्याचा सहभाग होता. यामध्ये 8 जवान शहीद झाले. पोलिसांनी त्यासाठी 10 लाखांचे बक्षीस ठेवले होते.