दिल्लीत भरधाव कारने तीन मुलांना चिरडले, पहा थरकाप उडवणार व्हिडिओ

WhatsApp Group

दिल्लीतील गुलाबीबाग परिसरात रविवारी एका कारने फूटपाथवर उभ्या असलेल्या तीन मुलांना चिरडले. तिन्ही मुले गंभीर जखमी आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, त्यात अनियंत्रित कार फुटपाथवर उभ्या असलेल्या तीन मुलांना चिरडताना दिसत आहे. एक मूल उडी मारून गाडीच्या मागे पडताना दिसत आहे.

अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित लोकांनी जखमी मुलांकडे धाव घेत त्यांना रुग्णालयात दाखल केले. काही लोकांनी कार चालकाला पकडून बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. जखमींपैकी दोन मुले 10 वर्षांची आहेत, तर तिसरी 6 वर्षांची आहे.

डीसीपी (उत्तर) सागर सिंग कलसी यांनी सांगितले की, आरोपीला अटक करण्यात आली आहे. गजेंद्र (30, रा. प्रताप नगर) असे त्याचे नाव आहे. रविवारी लीलावती शाळेजवळ त्याने कारसह तीन मुलांवर धाव घेतली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन मुलांची प्रकृती सुधारत आहे, तर 6 वर्षाच्या मुलाला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.