बीडमधील धक्कादायक घटना; जेवणातून विषबाधा झाल्याने तीन चिमुकल्यांचा मृत्यू तर आईची मृत्यूशी झुंज सुरू

WhatsApp Group

बीड – बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील वागझरी गावामधून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे रात्रीच्या जेवणानंतर विषबाधा Food poisoning झाल्यामुळे ३ चिमुकल्या भावंडांचा मृत्यू झाला आहे. तर आईची मृत्यूशी झुंज सुरु आहे. साधना धारासुरे वय ६ वर्ष, श्रावणी धारासुरे वय ४ वर्ष आणि मुलगा नारायण वय ८ महिने असे विषबाधेने मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत.

तर भाग्यश्री धारासुरे वय २८ वर्ष असे त्या चिमूकल्यांच्या आईचे नाव आहे. भाग्यश्री यांच्यावर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.