पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिराजवळ गुरुवारी आणखी एक स्फोट झाला. स्फोटामुळे परिसरात घबराट पसरली. अमृतसरमध्ये पाच दिवसांत तीन कमी-तीव्रतेच्या स्फोटांप्रकरणी पंजाब पोलिसांनी नवीन स्थानिक दहशतवादी नेटवर्कशी संबंधित 5 जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉम्ब बनवणारे नवखे होते आणि सुवर्ण मंदिराभोवती स्फोट घडवून पंजाबमध्ये अशांततेचे वातावरण निर्माण करण्याचा त्यांचा उद्देश होता. लवकरच पंजाब पोलीस पत्रकार परिषद घेऊन याप्रकरणी महत्त्वाचे खुलासे करणार आहेत.पोलिसांनी अमृतसर येथून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
तिसरा स्फोटही सुवर्ण मंदिराजवळ
तिसरा स्फोट कॉरिडॉरच्या बाजूला असलेल्या श्री गुरु रामदास सराईजवळ रात्री 1 वाजता सुवर्ण मंदिराजवळ झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. या स्फोटाचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक बाहेर आले. तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली, त्यानंतर फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली.
Amritsar | Picture of the alleged suspect behind the low-intensity explosion that occurred near Golden temple, last night, as per Punjab Police sources. pic.twitter.com/BBBeLDaaIz
— ANI (@ANI) May 11, 2023