
मुंबई विमानतळावर Mumbai airport धमकीचा मेल आला आहे. हा मेल शनिवारी (1 ऑक्टोबर) रात्री आला. मुंबई विमानतळावर इंडिगोच्या 6E 6045 या फ्लाइटमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती मेलमध्ये आली होती. इंडिगोचे हे विमान रात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल म्हणजेच मुंबई विमानतळावरून अहमदाबादला जाणार होते. तपासात काहीही संशयास्पद आढळले नाही. यानंतर रात्री उशिरा विमान सोडण्यात आले. पोलिसांनी हा धमकीचा मेल गांभीर्याने घेतला आहे. या संदर्भात पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत.
बॉम्बची गोष्ट पूर्णपणे अफवा होती. आता हा ईमेल कोणी आणि का केला याचा तपास सुरक्षा यंत्रणा करत आहेत. मुंबई पोलीस नियंत्रण कक्ष असो की मंत्रालय किंवा विमानतळ, अशा प्रकारचे धमकीचे संदेश, मेल, फोन कॉल्स किंवा पत्र येण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही असे मेल्स किंवा कॉल्स किंवा व्हॉट्सअॅप मेसेज येतच आहेत.
INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा