शांततेत वाचा हे छान सुंदर विचार, मनाला आनंद देऊन जातील

WhatsApp Group

ज्या व्यक्तीचे विचार सुंदर असतात, त्यांना कुठेही कधीही पराभूत केले जात नाही, यश हे निश्चित आहे. अफाट कष्ट, कर्म आणि योग्य अनुभव ज्ञानाशिवाय कोणीही यश प्राप्त करू शकत नाही. यश मिळविण्यासाठी आपले मन आणि विचारही शुद्ध असले पाहिजे आहेत.

  • लोकांना सुंदर विचार नाही, तर सुंदर चेहरे आवडतात..!!!
  • या जगात माणसाची नाही त्याच्या पैशांची किंमत असते…
  • या जगात तुम्ही ज्याच्यावर सर्वात जास्त प्रेम कराल तीच व्यक्ती तुम्हाला सर्वात जास्त रडवेल…
  • खरं बोलून कोणाला दुखावलं तरी चालेल पण खोट बोलून कोणाला सुख देऊ नका.
  • माणूस व्हा साधू नाही झालात तरी चालेल, संत ही नाही झालात तरी चालेल, पण माणूस व्हा माणूस…
  • अहंकारात सर्वात वाईट गोष्ट हि आहे कि, अहंकार तुम्हाला हे कधीच जाणवू देत नाही कि तुम्ही चुकीचे आहात…
  • जगात तीच लोकं पुढे जातात जे सूर्याला जागे करतात आणि तीच लोकं पाठीमागे राहतात ज्यांना सूर्य जागं करतो…

चांगले विचार मानवाला Motivation देतात आणि त्यांच्या यशाची पायरी बनून त्यांच्या जीवनात एक माध्यम, कॉफीडेन्स देतात. असे मानले जाते, की कर्म हे कर्मश्रेष्ठ आहे, जसे एखाद्या व्यक्तीने केलेले कर्म, तसेच त्याला फळ मिळते.

  • कलयुग नाही मतलबी युग चालू आहे…
  • जे बोलायचं आहे ते सरळ तोंडावर बोला, पाठीमागून तर कुत्रे सुद्धा भुंकत असतात…
  • माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक म्हणजे वाचलेली पुस्तके आणि दुसरी भेटलेली माणसे…
  • जगामधील सर्वात महागडे Gift म्हणजे वेळ.. कारण तुम्ही जेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमची अशी वेळ देता जी पुन्हा तुमच्या आयुष्यात येणारी नसते.
  • सर्व उत्तरे पण भेटतील आणि हिशोब पण फक्त माझी वेळ येऊद्या…
  • जर माणसाला गलिच्छ आणि घाणेरडे कपडे घालायची लाज वाटते तर गलिच्छ आणि घाणेरड्या विचारांची लाज का वाटू नये ?
  • त्या शिक्षणाचा काय उपयोग जे शिकुनही कचरा रस्त्यावर टाकतात, अन तोच कचरा रोज सकाळी न शिकलेली माणस उचलतात..

ज्या व्यक्तीला यश मिळवायचे असत, त्याला क्षुल्लक घटना ची आणि अपयशाची कधीच भीती वाटत नाही. ज्याप्रमाणे एखाद्या छोट्या होडीला समुद्रापुढे झुकायला आवडत नाही, म्हणून मोठया वादळातही बुडत नाही. 

  • आई आणि बायको दोघींची कदर करा… कारण एकीने तुम्हाला या दुनियेत आणल आणि दूसरी सारी दुनिया सोडून तुमच्या जवळ आलिये 
  • नेहमी माणस म्हणतात की स्त्रिया कधीच आपल खर वय सांगत नाहीत.,पण अस आहे की त्यांना आपल्या वयाचा खरा हिशोब लावता येत नाही. कारण त्या स्वतःसाठी खूप कमी जगलेल्या असतात.
  • नांव तर सगळेच लोक ठेवतात पण ठेवलेल्या नावाचा ब्रॉड करता आला पाहिजे…
  • दुःख त्याच व्यक्तीला भेटते जी व्यक्ति प्रत्येक नात मनापासून निभावत असते…
  • आपलं दुःख पाहुन कोणी हसले तरी चालेल, पण आपल हसणं बघुन, कोणी दु:खी राहता कामा नये.
  • माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं महत्वाचं नसतं तर, महत्वाचं असतं सुंदर नि तितकंच निरागस मन..
  • जवळचे पैसे कधीतरी संपणारच; पण ते संपण्याआधी कमावण्याचे मार्ग शोधून ठेवावेत.

ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही. कोणत्याही कृतीच्या मुळाशी एक माणूस म्हणून यशस्वी जीवन जगू पाहणाऱ्या प्रत्येकाने सुविचार आचरणात आणायला हवं.

  • काही लोक हे आगीसारखे असतात… विनाकारण जळत राहतात
  • अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी व्यक्ती आपल्या अंतकरणातील 3 गोष्टी ओळखेल. हसण्यामगील दुःख रागवण्या मागील प्रेम आणि शांत रहाण्यामागील कारण.
  • जोड़ीदार सुंदर नाही काळजी करणारा पाहिजे…
  • शाळेत मैत्री करा पण मैत्रीत शाळा करू नका.
  • कष्ट ही एक अशी चावी आहे जे नशीबात नसलेल्या गोष्टींचे सुध्दा दरवाजे उघडते.
  • तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल, तितकंच सुखी तुम्ही रहाल. आपल्या विषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल मनं शांत ठेवुन पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल…!
  • स्वाभिमान विकुन मोठे होण्यापेक्षा अभिमान बाळगुन लहान राहीलेले कधीही चांगले…