पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा यंदाचा १६ वा वर्धापनदिन पुण्यामध्ये (Pune) होणार आहे. मनसेचा हा १६ वा वर्धापनदिन पहिल्यांदाच मुंबईबाहेर होतं आहे. आज मनसेचा (MNS) १६ वा वर्धापन दिन (Anniversary) असून त्यासाठी मनसेकडून वर्धापन दिनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
गणेश कला क्रीडा मंच येथे हा भव्य वर्धापनदिन सोहळा पार पडणार असल्याची माहिती आहे. काही दिवसांत पुणे महापालिकेच्या निवडणुका (PMC Elections 2022) होणार आहेत, त्याच पार्श्वभूमीवर मनसे आता या वर्धापन दिनानिमित्त मोठं शक्ती प्रदर्शन करणार आहे.
१६ वर्षं…
लढा नवनिर्माणाचा!
लढा मराठी अस्मितेचा!
लढा महाराष्ट्र धर्माचा!
लढा भगव्याचा!लढा तुमचा, आमचा, महाराष्ट्र सैनिकांचा!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १६व्या वर्धापन दिनानिमित्त तमाम महाराष्ट्र सैनिकांना मनःपूर्वक शुभेच्छा!#मनसे_वर्धापन_दिन #चला_पुणे #MNSAdhikrut pic.twitter.com/S9NvfNlQDf
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 9, 2022
दरम्यान या सोहळ्याला राज्यभरातील मनसैनिक राहणार उपस्थित राहणार आहेत. राज ठाकरे आज काय बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.