आयपीएल २०२२ च्या लिलावाला अवघे काही तास उरले आहेत. १२ आणि १३ फेब्रुवारीला बेंगळुरूमध्ये भारतासह जगभरातील ५९० खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. यावेळी बोली लावणाऱ्या संघांची संख्या ८ ऐवजी १० आहे. या मोसमासह लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे नवे संघ खेळणार आहेत. अशा स्थितीत लिलावाची उत्सुकता पूर्वीपेक्षा आणखी वाढ आहे.
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही या स्पर्धेपूर्वी होणाऱ्या लिलावाबद्दल चाहत्यांना सर्वाधिक उत्सुकता असते आणि २००८ मध्ये हीच उत्सुकता होती जेव्हा ही स्पर्धा सुरू झाली आणि पहिल्यांदाच खेळाडूंचा लिलाव झाला आणि पहिला खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलियन दिग्गज लेग स्पिनर शेन वॉर्नला विकत घेतले होते.
२००८ मध्ये ही स्पर्धा एप्रिलमध्ये सुरू झाली, तर फेब्रुवारीमध्ये खेळाडूंचा लिलाव झाला. त्या लिलावात केवळ अशाच खेळाडूंवर बोली लावण्यात आली होती, ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केला होता.
खेळाडूंच्या लिलावापूर्वी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग आणि युवराज सिंग यांना ‘आयकॉन प्लेयर्स’ म्हणून त्यांच्या राज्यातील फ्रँचायझींचा भाग बनवण्यात आले होते. त्यानंतर २० फेब्रुवारीला पहिल्यांदा लिलाव झाला आणि त्यात पहिले नाव शेन वॉर्नचे आले होते. शेन वॉर्न IPL च्या इतिहासात पहिली बोली लागणारा खेळाडू ठरला होता.