
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री (TV Actress) अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्याबाबतही नेहमीच चर्चेत असते. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. बऱ्याचवेळा आपल्या फोटोंसह व्हिडिओ शेअर करत असते. पापाराझीसुद्धा अनेकदा इव्हेंट्स आणि अवॉर्ड शोमध्ये त्यांना कॅमेऱ्यामध्ये कैद करतात. नुकतंच अंकिताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Viedo) होत आहे. ज्यामध्ये तिने इतका डीप नेकचा ड्रेस परिधान केला होता की, ज्यामध्ये ती अस्वस्थ वाटत होती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक तिला ट्रोल करत आहेत.
View this post on Instagram
अंकिता लोखंडे नुकतंच पती विकी जैनसोबत एका इव्हेंटमध्ये पोहोचली होती. या इव्हेंटसाठी तिने अत्यंत डीप नेकचा चमकदार गाऊन परिधान केला होता. मात्र कारमधून उतरताना अंकिता आपल्या ड्रेसचा डीप नेक आपल्या हाताने कव्हर करताना दिसून आली. या ड्रेसमध्ये ती अस्वस्थ दिसून येत होती. सतत ती क्लिव्हेज लपवण्याचा प्रयत्न करत होती. ते पाहून सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून ती चांगलीचं ट्रोल होतं आहे.