विश्वचषकानंतर हा स्टार खेळाडू निवृत्त होणार! म्हणाला- ‘हा माझा शेवटचा विश्वचषक…’

0
WhatsApp Group

आयसीसी विश्वचषक 2023 अंतिम टप्प्यात आहे. याआधीच तीन संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आता चौथ्या स्थानासाठी न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात स्पर्धा आहे. इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान सामन्यानंतर उपांत्य फेरीतील चार संघ निश्चित होतील. या रोमांचक क्षणादरम्यान एका मोठ्या खेळाडूने निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहेत. विश्वचषकानंतर निवृत्त होणारा स्टार खेळाडू कोण आहे ते जाणून घ्या.

आयसीसी विश्वचषक 2023 मधील 44 वा सामना पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर होणार आहे. या सामन्यापूर्वी इंग्लंडचा स्टार खेळाडू डेव्हिड मलानने निवृत्तीचे संकेत दिले. पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळण्यापूर्वी डेव्हिड मलानने मोठे वक्तव्य केले आहे. विश्वचषकानंतर निवृत्त होणार असल्याचे संकेत दिले. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याबाबत मलान म्हणाला की, हा त्याचा शेवटचा सामनाही असू शकतो. या बातमीने इंग्लंड क्रिकेट संघात खळबळ उडाली आहे.

इंग्लंड या विश्वचषकातून आधीच बाहेर आहे. गतवेळचा विश्वविजेता संघ यंदा उपांत्य फेरीतही पोहोचू शकला नाही. इंग्लंडने आतापर्यंत खेळलेल्या एकूण 8 सामन्यांपैकी फक्त 2 जिंकले आहेत. विश्वचषकातील गुणतालिकेत संघ सहाव्या क्रमांकावर आहे. इंग्लंड आज आपला पुढचा सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. आता इंग्लंड विजयासह मायदेशी परतते की पाकिस्तानला विजयाची भेट देते हे पाहायचे आहे.