क्रिकेट विश्वात मोठी खळबळ, ‘या’ स्टार खेळाडूने अचानक घेतली निवृत्ती

WhatsApp Group

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय मालिका खेळणार आहे. पहिला सामना आजपासून (17 मार्च) रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे, मात्र त्याआधी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टीम पेनने निवृत्ती जाहीर केली आहे. तो त्याच्या खेळापेक्षा वादांमुळे जास्त चर्चेत राहिला. ऑस्ट्रेलियन संघासाठी तो तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळला.

शेफिल्ड शील्ड ट्रॉफीमध्ये क्वीन्सलँड आणि तस्मानिया यांच्यातील सामन्यानंतर टीम पेनने निवृत्ती जाहीर केली. ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम यष्टीरक्षकांमध्ये त्याची गणना होते. स्टीव्ह स्मिथने कर्णधारपद सोडल्यानंतर तो ऑस्ट्रेलियाचा 46 वा कर्णधार ठरला. त्याने 2010 मध्ये लॉर्ड्सवर पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण केले. कसोटी सामन्यात त्याची सर्वोत्तम धावसंख्या 92 धावा होती.

हेही वाचा – India Vs Australia: ऑस्ट्रेलियाचे ‘हे’ पाच खेळाडू भारतासाठी ठरू शकतात धोकादायक!

टीम पेनने ऑस्ट्रेलियासाठी 35 कसोटी, 35 एकदिवसीय आणि 12 टी-20 यासह 82 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. या 82 सामन्यांमध्ये त्याने 2400 हून अधिक धावा केल्या आहेत, ज्यात कसोटीत 1534 धावा, एकदिवसीय सामन्यात 890 धावा आणि T20 क्रिकेट कारकिर्दीतील 82 धावा यांचा समावेश आहे, परंतु पेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ एकच शतक झळकावले आहे.