माधुरी दीक्षितची ही साडी सर्वसामान्यांच्या बजेटच्या बाहेर, जाणून घ्या साडीची खासियत

WhatsApp Group

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित Madhuri Dixit तिच्या अनोख्या अभिनयासाठी तिच्या चाहत्यांच्या मनात घर करून आहे. माधुरी आपल्या सौंदर्याने चाहत्यांची मने घायाळ करत असते. नुकतीच माधुरी जांभळ्या रंगाच्या साडीत दिसली, या साडीची किंमत जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.अलीकडेच, अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर साडी घातलेला एक फोटो शेअर केला आहे. अभिनेत्रीची ही साडी पाहून सर्वांच्या नजरा अभिनेत्रीवर खिळल्या होत्या. माधुरीने नेसलेली ही साडी सर्वसामान्यांच्या बजेटच्या पलीकडची आहे.

जर ही साडी तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला आधी तिची किंमत जाणून घेणे आवश्यक आहे. ही साडी ऑनलाइन खरेदी करून तुम्ही कोणत्याही फंक्शनमध्ये स्वतःला सहज वेगळं दाखवू शकता. माधुरी दीक्षितची ही अनोखी साडी तोराणी वेबसाइटवर उपलब्ध आहे, जिथून तुम्ही ती खरेदी करू शकता. या साडीची एकूण किंमत तब्बल 1 लाख 15 हजार 500 रुपये  आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)