उद्यापासून बदलणार ‘हे’ नियम, तुमच्या खिशावर होणार परिणाम!

WhatsApp Group

1 ऑक्टोबरपासून सर्वसामान्यांच्या वापरात असलेल्या अनेक गोष्टी आणि नियमांमध्ये बदल होणार आहे. याचा परिणाम थेट तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर होणार आहे. 1 ऑक्टोबरपासून कोण- कोणते असणार आहेत हे आपण जाणून घेणार आहोत…

1 ऑक्टोबर किंवा त्यानंतर म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांनी नामांकन तपशील देणे आवश्यक असेल. त्याचबरोबर असे न करणाऱ्या गुंतवणूकदारांना एक डिक्लेरेशन भरावे लागणार आहे. डिक्लेरेशनमध्ये नामांकनाची सुविधा द्यावी लागेल. यापूर्वी हा नियम 1 ऑगस्ट 2022 पासून लागू होणार होता मात्र तसे होऊ शकले नाही आणि ही मुदत 1 ऑक्टोबर 2022 पर्यंत वाढवण्यात आली. आता पुढील महिन्यापासून हा नियम लागू होणार आहे.

शेअर मार्केटमधील व्यवहारासाठी डिमॅट अकाउंट हे खूपच गरजेचे असते. शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात येते. आता डिमॅट अकाउंटधारकांसाठी Two Factor Authentication करणे आवश्यक आहे. असे केले नाही तर तुम्हाला तुमचे डिमॅट अकाउंट सुरू करता येणार नाही.

दर महिन्याच्या 1 तारखेला सिलिंडरच्या किमती बदलतात. 1 ऑक्टोबर रोजी पेट्रोलियम कंपन्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल करू शकतात. जर कंपनीने एलपीजीच्या किमतीत बदल केला तर किमती कमी होण्याची/वाढण्याची शक्यता आहे.

फूड सेफ्टी रेग्युलेटर FSSAI ने 1 ऑक्टोबर 2021 पासून फूड बिझनेस ऑपरेटर्सना FSSAI परवाना क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक रोख पावत्यांवर नमूद करणे बंधनकारक केले आहे.

अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 5,000 रुपयांपर्यंत मासिक पेन्शन देण्यात येते. 18 वर्ष ते 40 वर्षापर्यंतच्या वयाची कोणतीही व्यक्ती या सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकते. पण आता 1 ऑक्टोबरपासून या योजनेत मोठा बदल होणार आहे. नव्या नियमांनुसार, आयकर भरणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा