‘या’ खेळाडूने अचानक सोडले संघाचे कर्णधारपद, चाहत्यांना मोठा धक्का

WhatsApp Group

एकदिवसीय विश्वचषक 2023 5 ऑक्टोबरपासून भारतीय भूमीवर सुरू होत आहे. यासाठी आतापर्यंत 9 संघ पात्र ठरले आहेत. वनडे विश्वचषक खेळण्याचे प्रत्येक संघाचे स्वप्न असते. मात्र भारतात होणाऱ्या क्रिकेटच्या महाकुंभासाठी आयर्लंडचा क्रिकेट संघ पात्र ठरू शकला नाही. याच कारणामुळे अँड्र्यू बालबर्नीने आयर्लंडच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे.

आयर्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार अँड्र्यू बालबर्नीने टी-20क्रिकेटमध्ये कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे. आयर्लंड क्रिकेटने याला दुजोरा दिला आहे. 32 वर्षीय बालबिर्नीने 2019 च्या अखेरीस संघाचे कर्णधारपद स्वीकारले. त्याने 4 कसोटी, 33 एकदिवसीय आणि 52 टी-20 सामन्यांमध्ये आयर्लंड संघाचे नेतृत्व केले आहे. आता त्याच्या जागी पॉल स्टर्लिंगची हंगामी कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, ज्याने 13 सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे.

अँड्र्यू बालबर्नीने सांगितले की, खूप विचार केल्यानंतर मी एकदिवसीय आणि टी-20 कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून या संघाचे नेतृत्व करणे ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. मला पाठिंबा दिल्याबद्दल मी खेळाडू, प्रशिक्षक, क्रिकेट आयर्लंड आणि आयर्लंड क्रिकेट संघाच्या चाहत्यांचा आभारी आहे. मला वाटते की ही माझ्यासाठी योग्य वेळ आहे, परंतु मी या संघासाठी माझे सर्वोत्तम कार्य करत राहीन आणि योगदान देण्यासाठी कठोर परिश्रम करेन. पुढील काही वर्षे आमच्यासाठी चांगली जातील अशी आशा आहे. धन्यवाद.

एकदिवसीय विश्वचषकातून संघ बाहेर

झिम्बाब्वेमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक पात्रता फेरीत आयर्लंडच्या संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. हा संघ सुपर सिक्समध्येही स्थान मिळवू शकला नाही, त्यांच्या चार गटातील केवळ एक सामना जिंकला. आयर्लंडला ‘ब’ गटात यूएईचा पराभव करण्यात यश आले. पात्रता फेरीत सातव्या स्थानासाठी खेळल्या गेलेल्या सामन्यात नेपाळचा पराभव केला. संघ जिंकताच अँड्र्यू बालबर्नीने हा निर्णय घेतला.