क्रिकेटविश्वातून धक्कादायक बातमी समोर आली. दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज माजी दिग्गज कर्णधार हाशिम आमला याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. या महान खेळाडूने यापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती मात्र तो देशांतर्गत क्रिकेट सामने खेळताना दिसत होता.
हाशिम आमलाने दक्षिण आफ्रिकेसाठी 124 कसोटी सामन्यांमध्ये 46.41 च्या सरासरीने आणि 49.97 च्या स्ट्राइक रेटने 9282 धावा केल्या आहेत. त्याने 181 एकदिवसीय सामन्यांमध्ये 49.47 च्या सरासरीने आणि 88.39 च्या स्ट्राइक रेटने 8113 धावा केल्या आहेत. 44 T20 मध्ये, या उत्कृष्ट फलंदाजाने 33.61 च्या सरासरीने आणि 132.06 च्या स्ट्राइक रेटने 1277 धावा केल्या आहेत. आमलाने कसोटीत 28 तर एकदिवसीय प्रकारात 27 शतके झळकावली आहेत.
676 matches
34,104 runs
89 centuries
175 fiftiesAn extraordinary career comes to an end 👏
Hashim Amla has retired from professional cricket 🙇
Read more: https://t.co/6mfiAA4jft pic.twitter.com/jAF5T5wdYP
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) January 18, 2023
या अनुभवी फलंदाजाने 22 जुलै 2012 रोजी ओव्हल येथे इंग्लंडविरुद्ध कसोटी फॉर्मेटमध्ये त्रिशतक केले होते. आमलाने इंग्लंडविरुद्ध 311 धावा केल्या होत्या. हाशिम किंग्ज इलेव्हन पंजाबकडूनही क्रिकेट खेळला आहे आणि सरेसाठीही त्याने चमकदार कामगिरी केली आहे. हाशिम अमलाने कौंटी क्रिकेटमध्ये अनेक शतके झळकावली आहेत.