भारत शैक्षणिक क्षेत्रात वेगाने पुढे जात आहे. येथील शाळा आता अधिक प्रगत पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. देशात अशा अनेक मोठ्या आणि चांगल्या शाळा आहेत, परंतु आपण ज्या शाळेबद्दल बोलत आहोत ती जगातील सर्वात मोठी शाळा आहे आणि सध्या भारतात आहे. तुमचा विश्वास बसणार नाही, इतकी मुले या शाळेत शिकतात की त्यांच्यासमोर अनेक देशांची लोकसंख्या कमी पडते
जगातील सर्वात मोठी शाळा कुठे आहे?
जगातील सर्वात मोठी शाळा उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे आहे. या शाळेचे नाव सिटी मॉन्टेसरी स्कूल आहे, या शाळेला CMS असेही म्हणतात. सध्याच्या घडीला या शाळेने दिलेल्या माहितीनुसार येथे 58 हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्यासाठी सुमारे 4500 कर्मचारी आणि शिक्षक आहेत आणि शाळेचे संपूर्ण शहरात 20 कॅम्पस आहेत.
सिटी मॉन्टेसरी स्कूलची स्थापना 1959 मध्ये 5 मुलांसह झाली. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे या शाळेचे संस्थापक डॉ.जगदीश गांधी आणि डॉ.भारती गांधी यांनी 300 रुपये कर्ज घेऊन ही शाळा सुरू केली. CMS मध्ये CISCE बोर्डातून शिक्षण घेतले जाते आणि येथील मुले दरवर्षी चांगले निकाल देतात. या शाळेत पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग शिकविले जातात.
या शाळेची फी किती आहे?
या शाळेमध्ये आकारण्यात येणाऱ्या शुल्काची संपूर्ण माहिती शाळेच्या माहितीपत्रकातून मिळू शकते. पण जर मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा असेल तर येथे फी दरमहा 4000 रुपये ते तीन महिन्यांसाठी 10 ते 12 हजार रुपये आहे. तथापि, वर्गानुसार ते कमी-अधिक असू शकते.