Australia vs West Indies 2nd Test: ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना असे काही पाहायला मिळाले जे सहसा फुटबॉलच्या मैदानावर घडते. वेस्ट इंडिजचा फिरकी गोलंदाज केविन सिंक्लेअरने विकेट घेतल्यानंतर कार्टव्हील करत आपली पहिली कसोटी विकेट सर्वांसाठी संस्मरणीय बनवली. कार्टव्हील करून सेलिब्रेशन करणारे खेळाडू अनेकदा फुटबॉल सामन्यांमध्ये दिसतात, पण केविनने ते क्रिकेटमध्ये केले. तेही कसोटी सामन्यात, याआधी क्रिकेट चाहत्यांनी हे कधीच अनुभवले नसेल.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी केव्हिन सिंक्लेअरने समालोचकांना आणि ब्रिस्बेनच्या प्रेक्षकांना चकित केले. पहिल्या डावात वेस्ट इंडिजने 311 धावा केल्या होत्या. त्या बदल्यात ऑस्ट्रेलियाने 9 गडी गमवून 289 धावांवर डाव घोषित केला. हातात एक विकेट असताना डाव घोषित केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वेस्ट इंडिजला 22 धावांची आघाडी मिळाली. दुसरीकडे, वेस्ट इंडिजचा गोलंदाज केविन सिंक्लेयरच्या सेलिब्रेशनची चर्चा रंगली आहे.
Kevin Sinclair takes his first Test wicket and marks the occasion with his signature celebration!
How good 🙌 #AUSvWI pic.twitter.com/xcRqgDdyIw
— 7Cricket (@7Cricket) January 26, 2024
फिरकीपटू केविन सिंक्लेयरने आपली डेब्यू विकेट घेतल्यानंतर जोरदार उड्या मारल्या. या उड्या पाहून प्रत्येक जण आश्चर्याने पाहात राहिला. केविन सिंक्लेयरने उस्मान ख्वाजाची मोठी विकेट जाळ्यात अडकवली. त्यानंतर त्याने उड्या मारत सेलिब्रेशन केलं. त्याची स्टाईल एखाद्या जिम्नॅस्टपेक्षा कमी दिसत नव्हती. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपल्या पदार्पणाच्या कसोटीतच हा कॅरेबियन खेळाडू आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आला आहे.
First Test wicket celebration done right! 😮💨#AUSvWI #WTC25 pic.twitter.com/T0Q7rUMIhC
— ICC (@ICC) January 26, 2024
केविन सिंक्लेअरने 2022 मध्येच आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तो वनडे फॉरमॅटमधून संघात आला. त्याने आतापर्यंत वेस्ट इंडिजसाठी 7 एकदिवसीय सामन्यात 11 बळी घेतले आहेत. मात्र, एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने केवळ 3 डावात फलंदाजी करत केवळ 38 धावा केल्या आहेत. आता या खेळाडूने लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये प्रवेश केला असून पहिल्याच सामन्यापासून त्याने आपली जादू दाखवण्यास सुरुवात केली आहे.