
12th Exam Result : महाराष्ट्रात दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. (10th and 12th board exam) दरम्यान या परिक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यावरून बराच काळ तर्कविर्तक सुरु होता. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना त्यांच्या बारावीच्या निकालाचे (12 th exam result) वेध लागले होते. मात्र आता विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली आहे. मुलांना घरबसल्या बारावीचा निकाल पाहता येणार आहे. ते ही तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या एसएमएसद्वारे 12 वीचा निकाल पाहता येणार आहे.
उद्या (8 जून) रोजी दुपारी 1 वाजता 12 वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहे. अनेकदा निकालाच्या वेळेस वेबसाईट्सवर एकदम मारा झाल्यामुळे वेबसाईट्स हॅंग होतात. अशावेळी विद्यार्थ्यांची निराशा टाळण्यासाठी मोबाईलवर निकाल पाहण्याची सोय बोर्डाकडून करण्यात आली आहे.
महाराष्ट्र बारावीचा निकाल 2022 एसएमएसद्वारे पाहण्याची पद्धत
- महाराष्ट्र 12वीचा निकाल 2022 एसएमएसद्वारे पाहण्यासाठी, विद्यार्थ्यांनी दिलेल्या फॉरमॅटमध्ये एसएमएस टाइप करणे आवश्यक आहे.
- या फॉरमॅटमध्ये एसएमएस टाइप करा : MHHSC<space>सीट क्रमांक लिहून 57766 वर पाठवा. तुम्हाला तुमचा रिझल्ट अवघ्या काही सेंकदात मिळणार आहे.