T20 World Cup 2024: विराट-रोहित नव्हे तर ‘या’ भारतीय खेळाडूनं टी-20 विश्वचषकात झळकावलय शतक

0
WhatsApp Group

T20 World Cup 2024: आता T20 विश्वचषक 2024 सुरू व्हायला काही दिवस उरले आहेत. आयसीसीची ही मेगा इव्हेंट 2 जूनपासून सुरू होणार आहे. T20 विश्वचषक 2007 मध्ये सुरू झाला. यावेळी स्पर्धेचा 9वा मोसम खेळला जाणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिज संयुक्तपणे याचे आयोजन करत आहेत. 2024 विश्वचषक स्पर्धेत विजेतेपदासाठी 20 संघ सज्ज आहेत. भारतीय संघ आधीच अमेरिकेत पोहोचला असून रोहित शर्मा आणि कंपनीने सरावही सुरू केला आहे.

टी-20 विश्वचषकात अनेक विक्रम झाले आहेत. मात्र, क्रिकेटच्या या सर्वात लहान फॉरमॅटच्या विश्वचषकात केवळ 11 शतके झळकावली आहेत. या यादीत फक्त 1 भारतीयाचे नाव आहे. हा भारतीय खेळाडू रोहित शर्मा किंवा विराट कोहली नसून तुफानी फलंदाज सुरेश रैना आहे. सुरेश रैनाने 2 मे 2010 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावले. त्याने 60 चेंडूत 168.33 च्या उत्कृष्ट स्ट्राईक रेटने 101 धावा केल्या. यादरम्यान त्याने 9 चौकार आणि 5 षटकारही मारले. तेव्हापासून आतापर्यंत 5 T20 विश्वचषक झाले आहेत, परंतु एकाही भारतीय फलंदाजाला शतक झळकावता आलेले नाही.

ख्रिस गेल हा टी-20 विश्वचषकात 2 शतके झळकावणारा एकमेव फलंदाज आहे. गेलने 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध शतक झळकावले होते. त्यांच्याशिवाय सुरेश रैना, महेला जयवर्धने, ब्रेंडन मॅक्युलम, ॲलेक्स हेल्स, अहमद शेहजाद, तमीम इक्बाल, जोस बटलर, रिले रुसो आणि ग्लेन फिलिप्स यांनी प्रत्येकी 1 शतक झळकावले आहे.

T20 विश्वचषकात शतक ठोकणारे फलंदाज

 • ख्रिस गेल: 117 धावा
 • सुरेश रैना: 101 धावा
 • महेला जयवर्धने: 100 धावा
 • ब्रेंडन मॅक्क्युलम: 123 धावा
 • ॲलेक्स हेल्स: 116 धावा
 • अहमद शहजाद: 111 धावा
 • तमिम इक्बाल : 103 धावा
 • ख्रिस गेल: 100 धावा
 • जोस बटलर: 101 धावा
 • रिले रुसो: 109 धावा
 • ग्लेन फिलिप्स: 104 धावा