W,W,W,W,W,W…; या गोलंदाजानं घेतल्या 6 चेंडूत 6 विकेट

0
WhatsApp Group

क्रिकेटमध्ये एका षटकात सलग 6 षटकार मारण्याचा पराक्रम अनेक फलंदाजांनी केला आहे, मात्र एका षटकात सलग 6 विकेट्स घेण्याची अनोखी घटना पहिल्यांदाच समोर आली आहे. गोलंदाजाने एका षटकात हॅट्ट्रिक घेणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे, पण असाही एक गोलंदाज आहे ज्याने एकाच षटकात दोन हॅट्ट्रिक घेण्याची अप्रतिम कामगिरी केली आहे. ही बातमी इंग्लंडची आहे आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या दुहेरी हॅटट्रिक करणाऱ्या गोलंदाजाचे वय केवळ 12 वर्षे आहे.

क्रिकेटच्या खेळात गोलंदाजाला हॅटट्रिक घेणे म्हणजेच सलग 3 विकेट्स घेणे खूप अवघड असते. पण ऑलिव्हर व्हाईटहाऊस या 12 वर्षीय इंग्लिश गोलंदाजाने आपल्या षटकातील प्रत्येक चेंडूवर विकेट घेत खळबळ उडवून दिली आहे. म्हणजेच या गोलंदाजाला एकाच षटकात डबल हॅट्ट्रिक घेण्यात यश आले आहे.

या सामन्यात ऑलिव्हर व्हाइटहाऊसने दोन षटके टाकली. त्याच्या दोन्ही षटकांत फलंदाजांना एकही धाव काढता आली नाही. त्याचबरोबर या कालावधीत त्याने एकूण 8 विकेट्स घेतल्या. मात्र, तो आंतरराष्ट्रीय सामना नव्हता, त्यामुळे ऑलिव्हरला तितकीशी प्रसिद्धी मिळाली नाही. या सामन्यात ऑलिव्हर ब्रॉम्सग्रोव्ह क्रिकेट क्लबकडून खेळत होता आणि त्याचा संघ कुकहिल क्लबविरुद्ध खेळत होता.