IPL Records: ‘या’ गोलंदाजाच्या नावावर आहे आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरीचा विक्रम, बुमराहचाही यादीत समावेश

WhatsApp Group

आयपीएल 2022 च्या मोसमात आतापर्यंत 4 गोलंदाजांनी 1 सामन्यात 5 बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. मुंबई इंडियन्सचा (MI) वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने सोमवारी कोलकाता नाइट रायडर्स (KKR) विरुद्धच्या सामन्यात 5 विकेट घेतल्या. बुमराहने 4 षटकात 10 धावा देत 5 खेळाडू बाद केले. अशा प्रकारे जसप्रीत बुमराह आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे. जाणून घेऊया आयपीएलच्या इतिहासातील टॉप-5 सर्वोत्तम गोलंदाजी परफॉर्मन्स.

अल्झारी जोसेफ

आयपीएलमधील सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम अल्झारी जोसेफच्या नावावर आहे. 2019 मध्ये मुंबई इंडियन्स (MI) कडून खेळताना जोसेफने 3.4 षटकात 12 धावांत 6 बळी घेतले. हा सामना सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध होता. सध्या, अल्झारी जोसेफ हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सचा (GT) भाग आहे.

सोहेल तन्वीर

IPL च्या पहिल्या सत्रात म्हणजेच 2008 मध्ये राजस्थान रॉयल्सचा (RR) गोलंदाज सोहेल तन्वीरने 4 षटकात 14 धावा देऊन 6 बळी घेतले होते. हा सामना राजस्थान रॉयल्स (RR) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला गेला होता.

अॅडम झाम्पा

IPL 2016 च्या मोसमात, पुणे सुपरजायंट्स (RPS) फिरकीपटू अॅडम झाम्पाने 4 षटकात 19 धावा देऊन 6 बळी घेतले. हा सामना विशाखापट्टणम येथे सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि पुणे सुपरजायंट्स (RPS) यांच्यात खेळला गेला होता.

अनिल कुंबळे

2008 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा (RCB) गोलंदाज अनिल कुंबळेने 3.1 षटकात 5 धावा देऊन 5 बळी घेतले होते. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात केपटाऊनमध्ये खेळला गेला होता.

जसप्रीत बुमराह

IPL 2022 मध्ये, मुंबई इंडियन्स (MI) चा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने 4 षटकात 10 धावा देऊन कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) 5 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मात्र, या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या टीम मुंबई इंडियन्सला (MI) पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र उत्कृष्ट गोलंदाजीसाठी जसप्रीत बुमराहला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.