या’ बड्या खेळाडूने अचानक घेतली निवृत्ती! सगळ्यांची झाली निराशा

WhatsApp Group

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस 2023 चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील केनिंग्टन ओव्हलवर खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा संघ सध्या तीन दिवस संपेपर्यंत मजबूत स्थितीत दिसत आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर इंग्लंडचा स्टार गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने अचानक अशी काही घोषणा केली ज्यामुळे संपूर्ण क्रिकेट जगतच नव्हे तर संपूर्ण क्रीडा जगताला आश्चर्याचा धक्का बसला. इंग्लंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 602 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणाऱ्या या खेळाडूने या कसोटी सामन्यानंतर निवृत्ती जाहीर केली.

ब्रॉडने 2014 पासून टी-20 आंतरराष्ट्रीय आणि 2016 पासून एकदिवसीय क्रिकेट खेळलेले नाही. म्हणजेच आता हा त्याच्या करिअरचा शेवटही मानला जाऊ शकतो. अनिल कुंबळेनंतर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा स्टुअर्ट ब्रॉड हा पाचव्या क्रमांकावर आहे. त्याला कुंबळेला मागे सोडण्याची संधी होती. मात्र 37 वर्षीय ब्रॉडने अचानक घेतलेल्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. जेम्स अँडरसननंतर ब्रॉड हा इंग्लंडसाठी सर्वाधिक कसोटी बळी घेणारा गोलंदाज आहे.

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर ब्रॉडनेच स्काय स्पोर्ट्सशी बोलताना याची घोषणा केली. ब्रॉडच्या खास फोटोसह इंग्लंड क्रिकेटने त्याचे आभार मानले आहेत. त्याच्या कारकिर्दीची आकडेवारीही शेअर केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या अॅशेस मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्यात ब्रॉडने त्याच्या 600 कसोटी बळी पूर्ण केले. या अॅशेसमधील त्याची कामगिरी आतापर्यंत चांगली राहिली आहे. ओव्हल कसोटीच्या पहिल्या डावात त्याने पाच विकेट्स घेतल्या होत्या. स्टुअर्ट ब्रॉड हा इंग्लंडच्या 2010 टी-20 विश्वचषक विजेत्या आणि चार वेळा ऍशेस विजेत्या संघाचा भाग आहे.

स्टुअर्ट ब्रॉडच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने 2006 मध्ये टी-20 फॉरमॅटमध्ये इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2007 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगने त्याला सहा षटकार ठोकले होते. त्या वाईट टप्प्यानंतर त्याने शानदार पुनरागमन केले आणि आज तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा दुसरा आणि एकूण पाचवा गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत 167 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 602 विकेट घेतल्या आहेत. सध्याच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात तो शेवटच्या वेळी गोलंदाजी करताना दिसू शकतो. त्‍याने कसोटी क्रिकेटमध्‍ये एक शतक आणि 13 अर्धशतकांसह 3656 धावा केल्या आहेत. याशिवाय ब्रॉडने 121 एकदिवसीय सामन्यांमध्ये 178 विकेट्स आणि 56 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 65 बळी घेतले आहेत.