
डेबिट कार्ड आणि एटीएम कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना बँकेने मोठा दिलासा दिला आहे. बँकेने एटीएम मशीन, ऑनलाइन आणि पीओएसमधून पैसे काढण्याची मर्यादा वाढवली आहे. कॅनरा बँकेने आपल्या अधिकृत वेबसाइटवर माहिती दिली आहे की आता ग्राहक पूर्वीपेक्षा जास्त पैसे काढू शकतात. बँकेने एटीएम रोख काढणे, पॉइंट ऑफ सेल (POS) आणि ई-कॉमर्स व्यवहारांसाठी दैनंदिन डेबिट कार्ड व्यवहार मर्यादेत तत्काळ प्रभावाने सुधारणा करण्याची घोषणा केली आहे.
बँकेने दिलेल्या माहितीनुसार, क्लासिक डेबिट कार्डसाठी एटीएममधून दररोज पैसे काढण्याची मर्यादा 40,000 रुपयांवरून 75,000 रुपये करण्यात आली आहे. या कार्ड्ससाठी PoS मर्यादा सध्याच्या रु. 1 लाख वरून रु. 2 लाख प्रतिदिन करण्यात आली आहे. NFC साठी, बँकेने कोणतीही रक्कम वाढवली नाही. पूर्वीप्रमाणेच 25 हजार रुपये आहे.
कॅनरा बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, जारी केलेली डीफॉल्ट कार्डे केवळ एटीएम आणि पीओएसमध्ये घरगुती वापरासाठी आहेत. कार्ड जारी करताना आंतरराष्ट्रीय, ऑनलाइन आणि ई-कॉमर्स व्यवहारांना परवानगी नाही. एटीएम, शाखा, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, आयव्हीआरएस द्वारे ग्राहकांना कार्ड चॅनेलनुसार सक्रिय किंवा निष्क्रिय करण्याची आणि मर्यादा सेट करण्याची सुविधा दिली जाते.
पंजाब नॅशनल बँकेने डेबिट कार्ड व्यवहार मर्यादा वाढवण्याची शिफारस केली आहे. असे झाल्यास, बँक MasterCard, Rupay आणि VISA Gold डेबिट कार्डची मर्यादा वाढवेल.
एचडीएफसी बँकेने तृतीय पक्ष व्यापाऱ्यांद्वारे केलेल्या भाडे देयकांसाठी शुल्क रचना सुधारित केली आहे. एचडीएफसी बँकेच्या वेबसाइटनुसार, तृतीय पक्ष व्यापाऱ्यांद्वारे केलेल्या भाड्याच्या पेमेंटसाठी, कॅलेंडर महिन्याच्या दुसऱ्या भाड्याच्या व्यवहारापासून एकूण व्यवहाराच्या रकमेच्या 1 टक्के शुल्क आकारले जाईल.